मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, या पात्र कुटुंबांना मिळणार मोफत घरकुल, यादीत आपले नाव चेक करा

[ad_1]

महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध समाजातील लोकांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. रमाई आवास घरकुल योजना ही त्यांच्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन आलेली आहे. या योजनेमुळे अनेक लोकांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज आपण या महत्त्वाच्या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

समाजातील दुर्बल घटकांसमोर येणारी आव्हाने – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची घरे बांधणे किंवा विकत घेणे हे अशक्य होते.

शहरातील घरांच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे स्वतःचे घर खरेदी करणे हे त्यांच्या आवाक्या बाहेरचे होत आहे. यामुळे अनेकांना झोपडपट्टीत राहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे ती म्हणजे रमाई आवास घरकुल योजना.

रमाई आवास योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लोकांचे राहणीमान उंचावणे आणि त्यांच्या निवाऱ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे हा आहे. शासनाने या योजनेद्वारे या समाजातील लोकांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम तारीख – या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपले अर्ज हे सादर करता येणार आहेत. ही मुदत अंतिम असून, यानंतर यासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेच्या आत हे अर्ज करणे गरजेचे आहे.

  • योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडलेली असावीत.
  • ऑफलाईन पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागात, जमा करावेत.
  • अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती जरूर घ्यावी.

तर मित्रानो तुम्हाला रमाई आवास योजनेची माहिती कशी वाटली नक्की सांगा पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा

Leave a Comment