[ad_1]
नमस्कार मित्रानो केंद्र सरकारने 2024-25 च्या रब्बी पिकांसाठी (गहू, हरभरा, मसूर, मोहरी, सूर्यफूल, ज्वारी) हमीभाव जाहीर केला आहे. यावर्षी सर्वाधिक वाढ गहू आणि मोहरीच्या हमीभावात करण्यात आली आहे.
गव्हाच्या हमीभावात 150 रुपये तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयांची वाढ केली आहे. इतर पिकांच्या हमीभावात किती वाढ झाली आणि यावर्षीच्या रब्बी पिकांसाठी नवीन हमीभाव काय असेल, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
हे सुद्धा वाचा
रब्बी हंगाम 2024-25 साठी पीकनिहाय हमीभाव
1) गहू
- मागील हंगामातील हमीभाव – 2,275 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव – 2,425 रुपये प्रति क्विंटल
- वाढ: 150 रुपये
2) मोहरी
- मागील हंगामातील हमीभाव – 5,650 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव- 5,950 रुपये प्रति क्विंटल
- वाढ: 300 रुपये
3) हरभरा
- मागील हंगामातील हमीभाव – 5,440 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव – 5,650 रुपये प्रति क्विंटल
- वाढ – 210 रुपये
4) मसूर
- मागील हंगामातील हमीभाव – 6,425 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव – 6,700 रुपये प्रति क्विंटल
- वाढ: 275 रुपये
हे सुद्धा वाचा
5) ज्वारी
- मागील हंगामातील हमीभाव – 1,850 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव – 1,980 रुपये प्रति क्विंटल
- वाढ – 130 रुपये
6) सूर्यफूल
- मागील हंगामातील हमीभाव – 5,800 रुपये प्रति क्विंटल
- यावर्षीचा हमीभाव – 5,940 रुपये प्रति क्विंटल
- वाढ – 140 रुपये
गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी वाढल्यामुळे आता प्रति क्विंटल 2,425 रुपये मिळतील, ज्याचा लाभ शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात होईल. तसेच मोहरीच्या हमीभावात झालेली 300 रुपयांची वाढ देखील महत्त्वाची आहे. याशिवाय इतर पिकांमध्ये देखील काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.