सरकारची मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप , असा करा अर्ज

[ad_1]

शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 90% ते 95% अनुदानावर सोलार पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. यामध्ये पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप योजना तसेच महावितरणच्या माध्यमातून सोलार पंप योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 अंतर्गत राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप प्रदान केले जाणार आहेत.

सोलार पंप मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन प्रमुख प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे – सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंट. महावितरणने पात्र शेतकऱ्यांना यासंबंधी आवश्यक मेसेज पाठवले आहेत, आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 ऑक्टोबरची अंतिम तारीख निश्चित केली आहे.

जर तुम्ही सोलार पंपासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला सेल्फ सर्वेक्षण व पेमेंटसाठी मेसेज आला असेल, तर 24 ऑक्टोबरच्या आत या प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, प्रक्रिया न केल्यास तुमचा अर्ज बाद होऊन, इतर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची संधी दिली जाईल.

हे सुद्धा वाचा

सोलार पंपासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सूचना प्राप्त होते. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे तुम्ही ऑनलाईन देखील तपासू शकता. परंतु 24 ऑक्टोबरपूर्वी सेल्फ सर्वे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण न केल्यास पात्र असतानाही सोलार पंप मिळणार नाही.

शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Comment