[ad_1]
सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारात सोने खरेदीदारांचा उत्साह वाढलेला आहे. मुख्यतः लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामाच्या काळात ही घसरण सोने खरेदीदारांसाठी आकर्षक ठरत आहे. अनेक ज्वेलरी शॉप्समध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, सोन्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा घेत अनेक लोक आपल्या भविष्यातील गरजांसाठी सध्याच्या परिस्थितीत सोने खरेदी करत आहेत. लग्न समारंभ, मुलांच्या शिक्षणासाठीची बचत किंवा निवृत्तीनंतरच्या काळासाठीची गुंतवणूक अशा विविध कारणांसाठी सध्या ग्राहक सोने खरेदी करत आहेत.
हे सुद्धा वाचा
मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 77,390 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी खाली आली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,940 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी झाली आहे. या किंमती गेल्या काही महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आल्या आहेत.
सोन्याच्या किमतीमधील घसरणीचे सध्या अनेक कारणे आहेत. जागतिक बाजारपेठेत असनारी अस्थिरता, अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असलेली अनिश्चितता ही सोन्याच्या भावात घसरण होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. मात्र, ही घसरण तात्पुरती असू शकते आणि येत्या काळामध्ये सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
हे सुद्धा वाचा
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. देशभरातील प्रमुख बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा दर 200 रुपयांपर्यंत कमी झालेला आहे. ही घट लक्षात घेता, बाजार विश्लेषक आणि तज्ज्ञांचे असे मत आहे की सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे सध्या सोने बाजारात ग्राहकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर मित्रांनो तुम्ही पण सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर यापेक्षा चांगली संधी कोणतीच नाही , तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आजच आपल्या मित्रांसोबत शेअर करा.