general loan waiver state नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार अनुदान येथे क्लिक करून जाणून घ्या

Posted on

NEWS, SARKARI YOJANA

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

general loan waiver state नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.

यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. तर, सर्व जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी, खासगी आणि शासकीय बॅंकांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघू संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्यात येणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ३३ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान general loan waiver state

लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

२०१९ मधील महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्र, परंतु तांत्रिक बाबींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणच्या सूचना सर्व जिल्हा, सहकारी, शासकीय बॅंकांना केल्या आहेत. सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण झाल्यावर ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. ही संख्या सुमारे ३० हजार शेतकरी एवढी आहे.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment