महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी महत्वाची योजना “माझी लाडकी बहीण योजना” पहा नवीन अपडेट

महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना “माझी लाडकी बहीण” राबविली आहे. या योजनेअंतर्गत, 2024 या वर्षासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिन्याला मदत देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मदत होईल.

31 जुलै 2024 पर्यंत मंजूर झालेल्या अर्जांनुसार, 17 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचा १ टप्पा राबविला गेला. या टप्प्यात, ज्या महिलांनी आधार सिडींग आणि ई-केवायसी पूर्ण केली होती, त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. परंतु, काही महिलांनी हे प्रक्रीया पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यामुळे, शासनाने या महिलांना लवकरात लवकर आधार सिडींग आणि E-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

👉“गाय गोठा अनुदान योजना” असा करा योजनेसाठी अर्ज मिळणार २ लाख रुपये अनुदान

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेल्या अर्जांवर 31 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यासाठी नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) निधी करण्यात आला आहे. या वेळी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पात्र अर्जांचा लाभ महिलांना दिला जाईल. त्यामुळे, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने ती पूर्ण करण्याचे महत्वाचे आहे.

“माझी लाडकी बहीण योजना” योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक सक्षमीकरण साध्य करणे हा आहे. कोरोना च्या महामारीच्या काळात अनेक महिलांचे उत्पन्न कमी झाले होते. या योजनेद्वारे त्यांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत हि होईल. महिलांना आर्थिक साह्यता मिळाल्याने त्यांच्या घरकुलाचे व्यवस्थापन, रोजगार, शिक्षण, आणि आरोग्य यावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

या योजनेबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून, आता दुसरा कार्यक्रम नागपूर येथे 31 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमधून महिलांना योजनेची सविस्तर माहिती देऊन त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

👉ई-पीक पाहणीची यादी झाली जाहीर ;असे पहा यादीत नाव

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपली आधार सिडींग आणि ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी ह्या प्रक्रियेची पूर्तता करावी. तसेच, सरकारने बँकांना आदेश दिले आहेत की, “माझी लाडकी बहीण योजना” योजनेतून जमा होणारी रक्कम कोणत्याही कारणाने कपात केली जाऊ नये.

“माझी लाडकी बहीण योजना ” योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी या योजनेचा वापर केला जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आवश्यक प्रक्रीया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ मिळू शकेल.

Leave a Comment