Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने बॅंक अकाउंट साठी महत्त्वाचे आदेश दिले आहे.

Posted on

NEWS, SARKARI YOJANA

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

Ladki Bahin Yojana राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत जुलै  ऑगस्ट या महिन्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच अनेकांना काढता येईनाशी झाली. तसेच कर्जाच्या थकीत हफ्त्यांमधून वसूल होत असल्याने रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका असे आदेश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु. ३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) अदा करण्यात आला आहे.

तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे (Ladki Bahin Yojana State Orders Banks) सूचना देण्यात येत आहेत:

१) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही.Ladki Bahin Yojana

२) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.

३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.Ladki Bahin Yojana

 लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचे बॅंकांना दिलेल्या आदेशाची प्रत पाहण्यासाठ येथे क्लिक करा.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment